गीतपट्टा यादी: नवीन जोडा
हे दोन वेव्हफॉर्म किंवा स्पेक्ट्रोग्राम दृश्यात असू शकतात.
- नाव गीतपट्टा - ध्वनि भाष्य करण्यासाठी
- वेळ गीतपट्टा - ध्वनीची वेळ ताणण्यासाठी
- टीप गीतपट्टा - एमआयडीआय आयात करून तयार केले, आणि या यादीमधून नाही.
मोनो गीतपट्टा Ctrl + Shift + N अतिरिक्त
नवीन, रिक्त मोनो ध्वनि गीतपट्टा तयार करते. या आदेशाची क्वचितच आवश्यकता असते, कारण आवश्यकतेनुसार आयात, ध्वनीमुद्रण आणि मिश्रण आपोआप नवीन गीतपट्टा तयार करतात. परंतु तुम्ही याचा वापर विद्यमान गीतपट्ट्यामधील माहिती कट किंवा कॉपी करण्यासाठी आणि रिकाम्या गीतपट्टामध्ये पेस्ट करण्यासाठी करू शकता.
स्टिरिओ गीतपट्टा
नवीन, रिक्त स्टिरिओ ध्वनि गीतपट्टा तयार करते. तुम्ही मोनो गीतपट्टाच्या संचाने सुरुवात करत असल्यास आणि स्टिरिओ मिक्स निर्यात करू इच्छित असल्यास तुम्हाला याची आवश्यकता असू शकते.
लेबल गीतपट्टा
नवीन, रिक्त लेबल गीतपट्टा तयार करते. जेव्हा लेबल गीतपट्टामध्ये पिवळी फोकस बॉर्डर असते तेव्हा तुम्ही फक्त टाइप करून लेबल तयार करू शकता. नावपट्ट्या मजकूर भाष्यासाठी वापरली जाऊ शकतात आणि एकाच गीतपट्ट्यावरून अनेक धारिका निर्यात करताना सामान्यतः वापरली जातात.
वेळ गीतपट्टा
एक टाइम गीतपट्टा तयार करतो जो प्रकल्पामधील सर्व ध्वनि गीतपट्ट्याचा प्लेबॅक गती (आणि पिच) हळूहळू वाढवू किंवा कमी करू शकतो. संभाव्य स्पीड वार्पची श्रेणी गीतपट्टाच्या डावीकडे टाइम गीतपट्टा ड्रॉपडाउन यादीमधील सेट रेंज (वरच्या आणि खालच्या) पर्यायामध्ये सेट केली आहे. लिफाफा साधन वापरून त्या श्रेणीतील वार्पिंगचे प्रमाण आणि दिशा नियंत्रित केली जाते.
टीप गीतपट्टा
टीप गीतपट्टा MIDI आयात करून तयार केले जातात, उदाहरणार्थ, या यादीमधून नाही.