सानुकूलन (कस्टमायझेशन)

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेमधून
येथून जा : निर्देशक, शोधा
प्रदान केलेले कीबोर्डचे सोपे मार्ग जोडणे आणि बदलणे आणि अतिरिक्त प्लग-इन लोड करणे यासह ऑड्यासिटी अनेक मार्गांनी सानुकूलित केली जाऊ शकते.

प्राधान्ये सानुकूलित करा

  • प्राधान्ये हे असे सेटिंग्ज आहेत जे तुम्हाला ऑड्यासिटीचे बहुतेक पूर्वनियोजित वर्तन बदलू देतात.


कीबोर्डचे सोपे मार्ग सानुकूलित करा

  • ऑड्यासिटीमध्ये अनेक क्रिया करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड संयोजन वापरू शकता; उदाहरणार्थ कीबोर्डवरील Ctrl + 1 दाबल्याने एका चरणात झूम होते. कीबोर्ड प्राधान्ये टॅबवर वेगवेगळ्या आदेशांशी संबंधित संयोजन बदलले किंवा जोडले जाऊ शकतात.


प्लग-इन सानुकूलित करा

ऑड्यासिटीमध्ये अतिरिक्त कार्यक्षमता जोडण्यासाठी तुम्ही प्लग-इन डाउनलोड आणि स्थापित करू शकता. प्लग-इन तुम्हाला अतिरिक्त प्रभाव, किंवा अधिक ध्वनि निर्मिती आणि विश्लेषण क्षमता देऊ शकतात.

Bulb icon एन.वाय.किस्ट प्लग-इन या मजकूर धारिका आहेत, त्यामुळे त्या सुधारणे तुलनेने सोपे आहे किंवा अगदी कोणत्याही मजकूर संपादकामध्ये आपले स्वतःचे एन.वाय.किस्ट प्लग-इन तयार करा.
  • इतर प्लग-इन स्वरूप : इतर प्लग-इन स्वरूप जोडले जाऊ शकतात :


संकल्पना सानुकूलित करा

तुम्ही संकल्पना वापरून ऑड्यासिटीचे स्वरूप आणि रंग बदलू शकता..


अंतिम सानुकूलन

कोणीही आमचा मूळ सांकेतिक शब्दकोश डाउनलोड करू शकतो. सांकेतिक शब्दकोश बदलल्याने आणि ऑड्यासिटी पुन्हा संकलित केल्याने तुम्हाला त्याच्या वर्तनाचे कोणतेही पैलू बदलण्याची किंवा प्रायोगिक किंवा वैकल्पिक वैशिष्ट्ये चालू करण्याची परवानगी मिळते.

ऑड्यासिटी विकीवर विंडोज, मॅक आणि जीएनयू/लिनक्स साठी ऑड्यासिटी संकलित करण्याचे आमचे मार्गदर्शक पहा. तुम्हाला संकलित करण्यात मदत हवी असल्यास, कृपया आमच्या ऑड्यासिटी मंचा वरील ऑड्यासिटी संकलित करणे बोर्ड वर विचारा .

तुम्हाला ऑड्यासिटी सांकेतिक शब्दकोश पायासह काम करण्यात स्वारस्य असल्यास कृपया आमच्या विकसक समुदायात सामील होण्याचा विचार करा. तुमचे सांकेतिक शब्दकोश बदल सर्व वापरकर्त्यांच्या फायद्यासाठी ऑड्यासिटीमध्ये संभाव्यपणे समाविष्ट केले जाऊ शकतात.