मदत यादी
- यात डायग्नोस्टिक आज्ञासचे सबयादी देखील समाविष्ट आहेत.
द्रुत मदत
आपल्या माहितीपुस्तकाचा "सुरुवात करणे" विभाग - द्रुत माहिती, जी आपल्या ब्राउझरमध्ये प्रदर्शित केली जाईल, ध्वनि कसा प्ले करावा, ध्वनीमुद्रित आणि संपादित करावा आणि एम.पी.३ किंवा डब्ल्यू.ए.व्ही. सारख्या ध्वनि धारिकेत निर्यात केला जाईल.
माहितीपुस्तिका
आपल्या ब्राउझरमध्ये प्रदर्शित असलेल्या आमच्या माहितीपुस्तिका मुख्य विभागांमध्ये आपल्याला नेईल :
- शिकवण्या
- ऑड्यासिटी वापरणे - डिजिटल ध्वनीसह कार्य करण्याच्या मूलभूत संकल्पना
- संदर्भ - सर्व यादी, बटणे आणि नियंत्रणे
- संकीर्ण - शब्दकोष आणि सतत विचारले जाणाऱ्या प्रश्नांसह
निदान
ऑड्यासिटीमधील समस्यांचे निदान करण्यात मदत करण्यासाठी निदान उपयादीमध्ये साधनांचा संच आहे.
अद्यतनांसाठी तपासा...
हे तुम्हाला ऑड्यासिटी वेबसाइटच्या डाउनलोड पृष्ठावर घेऊन जाईल जिथे तुम्ही ऑड्यासिटीची नवीनतम आवृत्ती काय आहे हे पाहू शकता. तुम्ही तुमच्या आत्ताच्या आवृत्तीशी नवीनतम रिलीझची तुलना करू शकता, जी ब्राउझरच्या पत्ता साधनपट्टीमध्ये "?from_ver" वर दाखवली जाईल आणि जे तुम्ही ऑड्यासिटी बद्दल... यावर देखील पाहू शकता.
ऑड्यासिटी बद्दल...
"ऑड्यासिटी बद्दल" संवाद दाखवतो, ज्यात यासाठी टॅब आहेत::
- ऑड्यासिटी आवृत्तीची माहिती, क्रेडिट आणि ऑड्यासिटीमध्ये वापरल्या जाणार्या ग्रंथालयची यादी
- सद्य बांध्यासाठी माहिती तयार करा, त्यात धारिका स्वरूपन समर्थन, सक्षम ग्रंथालय आणि वैशिष्ट्ये आणि तयार केलेल्या स्त्रोत कोड कमिट नंबरचा समावेश आहे
- जीपीएल व्ही 2 परवाना.