ऑड्यासिटी यादी

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
येथून जा : निर्देशक, शोधा


ऑड्यासिटी यादी केवळ मॅकोस / ओएस एक्स वर दिसून येतो. यात काही आज्ञा समाविष्ट आहेत जे नॉन-मॅक प्रणालीवरील इतर यादीमध्ये आहेत, तसेच काही यादीमधील घटक, जे कार्य प्रणालीद्वारे निर्मित केले गेले आहेत.

ऑड्यासिटी बद्दल ...

इतर कार्य प्रणालीवर मदत > ऑड्यासिटी बद्दल... यासारखीच आवृत्ती, क्रेडिट्स, बिल्ड आणि परवाना माहिती आहे.

प्राधान्ये ...

इतर कार्य प्रणालीवर संपादन > प्राधान्ये... सारख्याच निवडी आहेत.

सेवा

हा एक प्रणाली-निर्मित यादी आहे, ज्यात शोधक आणि डिस्क युटिलिटी सारख्या प्रणालीतील साधन्सचा समावेश आहे. वापरकर्त्याने कोणते अनुप्रयोग स्थापित केले आहेत आणि त्यांनी कोणत्या सेवा प्रदान केल्या आहेत यावर त्याची अचूक सामग्री अवलंबून असेल.

लपवा आणि दर्शवा

  • ऑड्यासिटी लपवा :
डॉकमध्ये कमी न करता ऑड्यासिटी आणि त्याच्या सर्व विंडो लपवते.
  • इतर लपवा :
ऑड्यासिटी व्यतिरिक्त सर्व अनुप्रयोग लपवते.
  • सर्व दाखवा :
सर्व अनुप्रयोग आणि त्यांचे विंडो दर्शविते.

ऑड्यासिटी मधून बाहेर पडा

सर्व प्रकल्प विंडो बंद करते आणि धारिका > बाहेर पडा अन्य कार्य प्रणालीवर निर्गमन केल्याप्रमाणे ऑड्यासिटीमधून बाहेर पडते.