अतिरिक्त यादी : मिक्सर
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
अतिरिक्त > मिक्सर यादी प्लेबॅक आणि ध्वनीमुद्रण व्हॉल्यूम समायोजित करण्यासाठी आज्ञा प्रदान करतो. मिक्सर साधनपट्टी वरील ध्वनीमुद्रण आणि प्लेबॅक स्लाइडरमध्ये फेरफार करण्याऐवजी तुम्ही या आज्ञा्स वापरू शकता.
प्लेबॅक आवाज समायोजित करा
प्लेबॅक व्हॉल्यूम संवाद प्रदर्शित करते. तुम्ही प्लेबॅक व्हॉल्यूमसाठी नवीन मूल्य टाइप करू शकता (० आणि १ दरम्यान), किंवा टॅब दाबा, नंतर स्लाइडर समायोजित करण्यासाठी डाव्या आणि उजव्या बाण की वापरा.
प्लेबॅक आवाज वाढवा
प्रत्येक की दाबल्याने प्लेबॅक व्हॉल्यूम ०.१ ने वाढेल.
प्लेबॅक आवाज कमी करा
प्रत्येक की दाबल्याने प्लेबॅक व्हॉल्यूम ०.१ ने कमी होईल.
ध्वनीमुद्रण आवाज समायोजित करा
ध्वनीमुद्रण व्हॉल्यूम संवाद प्रदर्शित करते. तुम्ही ध्वनीमुद्रण व्हॉल्यूमसाठी नवीन मूल्य टाइप करू शकता (० आणि १ दरम्यान), किंवा टॅब दाबा, नंतर स्लाइडर समायोजित करण्यासाठी डाव्या आणि उजव्या बाण की वापरा.
ध्वनीमुद्रण आवाज वाढवा
प्रत्येक की दाबल्याने ध्वनीमुद्रण व्हॉल्यूम०.१ ने वाढेल.
ध्वनीमुद्रण आवाज कमी करा
प्रत्येक की दाबल्याने ध्वनीमुद्रण व्हॉल्यूम ०.१ ने कमी होईल.