लय बदला

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
येथून जा : निर्देशक, शोधा


निवडीची लांबी (कालावधी) व पट्टी न बदलता टेम्पो बदलण्यासाठी टेम्पो बदला वापरा.

एकाच वेळी टेम्पो आणि पट्टी बदलण्यासाठी, प्रभाव > टेम्पो बदला.

याद्वारे प्रवेश : प्रभाव > टेम्पो बदला...
Change Tempo.png
इनपुट डबे जोडलेले आहेत. त्यामुळे एका डब्यामधील मूल्य बदलल्याने इतर डब्यातील मूल्ये योग्यपणे बदलतील.

बदल टक्केवारी

तुम्हाला निवडीचा टेम्पो किती बदलायचा आहे हे तुम्हाला माहीत असल्यास, इनपुट डब्यामध्ये ते मूल्य प्रविष्ट करा. तुम्ही मूल्य निवडण्यासाठी स्लायडर ड्रॅग देखील करू शकता: तुम्ही स्लायडर ड्रॅग करताच इनपुट डबा अद्यतन होईल.

प्रति मिनिट बीट्स (बीपीएम)

तुम्हाला निवडीचे बीपीएम आणि तुम्हाला ते बदलायचे असलेले बीपीएम माहित असल्यास, ती मूल्ये येथे प्रविष्ट करा. बीपीएम "पर्यंत" मूल्य नंतर टक्के बदल आणि लांबी "पर्यंत" मूल्ये अद्यतनित करेल.

लांबी

निवडीची नवीन लांबी किती असावी हे तुम्हाला माहीत असल्यास, ते मूल्य पर्यंत इनपुट डब्यामध्ये प्रविष्ट करा. पासून डबा निवडीची वर्तमान लांबी दर्शवितो आणि ती बदलता येत नाही. जर तुमच्याकडे वर्णनाचा एक भाग असेल जो तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बसवता येण्याइतका थोडा लांब किंवा खूपच लहान असेल तर हे उपयुक्त आहे.

उच्च दर्जाचे स्ट्रेचिंग वापरा (मंद)

हा चेकबॉक्स सक्षम केल्यास त्यासारखाच एसबीएसएमएस हा उच्च दर्जाचा अल्गोरिदम वापरला जातो जो स्लाइडिंग स्ट्रेच प्रभावात वापरलेला असतो. लहान ते मध्यम गती बदलांसाठी वापरल्या जाणाऱ्या बदलांची , गुणवत्ता परिणामी सामान्यतः जास्त असेल, विशेषत: पर्क्यूसिव्ह संगीत (जसे की पियानो संगीत). वापरला जातो. हा चेकबॉक्स जर सक्षम केला असेल, तर पट्टी बदला हे अत्यंत मंडपणे चालेल, पण संपूर्ण मजकूर टिकवून ठेवेल.

मर्यादा

टेम्पो बदलणे हा एक वेळ-स्ट्रेचिंग प्रभाव आहे, कारण तो ध्वनिचा वेग कमी केल्याने (त्याची लांबी वाढवल्याने) पट्टी कमी होईल आणि तसेच उलटपक्षी (क्रम बदलून) होईल ही सामान्य अपेक्षा नाकारतो. कोणत्याही वेळ-स्ट्रेचिंग प्रभावाप्रमाणे, काही श्रवणीय विकृती अधिक सेटिंग्जमध्ये अपेक्षित आहेत.

पूर्वनियोजित (जलद) अल्गोरिदम वापरताना, टेम्पो बदला निवडीच्या सुरूवातीपासून किंवा शेवटपासून काही ध्वनि काढून टाकू शकतो किंवा सामग्रीचा शेवट निवडीच्या शेवटपर्यंत वाढवू शकत नाही. ही दोन्ही लक्षणे परिणामी निवडीच्या शेवटी एक लहान शांतता सोडू शकतात. ध्वनिची अचूक लांबी महत्त्वाची असल्यास, उच्च दर्जाचे स्ट्रेचिंग (मंद) वापरा पर्याय निवडा.

पूर्वनियोजित (जलद) अल्गोरिदम काहीवेळा प्रतिध्वनिसारखे वाटू शकते, विशेषत: पर्क्युसिव्ह संगीत कमी करताना. लहान ते मध्यम टेम्पो बदलांसाठी, ही समस्या टाळण्यासाठी "उच्च गुणवत्ता" पर्याय वापरा.

"उच्च दर्जाचे" अल्गोरिदम फक्त लहान ते मध्यम टेम्पो बदलांसाठी योग्य आहे आणि तीव्र बदलांसाठी आवाजाची गुणवत्ता खूपच खराब होईल. अत्यंत गती कमी करण्यासाठी, पॉलस्ट्रेच प्रभाव वापरण्याचा विचार करा.

बटणे

आज्ञा बटणावर क्लिक केल्याने खालील परिणाम मिळतात:

  • व्यवस्थापित करा ड्रॉपडाउन यादी आपल्याला साधनाचे प्रीसेट सेट करण्यास आणि साधनबद्दल काही तपशील पाहण्यास सक्षम करते. तपशीलांसाठी प्रीसेट्स व्यवस्थापित करा पहा.
  • पूर्वावलोकन ध्वनिमध्ये वास्तविक बदल न करता, सध्याच्या रचनेसह प्रभाव लागू केल्यास ध्वनि कसा ऐकू येईल याचे लहान पूर्वावलोकन प्ले करते. पूर्वावलोकनाची लांबी संपादन > प्राधान्ये > प्लेबॅक मधील आपल्या सेटिंगद्वारे निर्धारित केली जाते, पूर्वनियोजित सेटिंग 6 सेकंद आहे.
  • ठीक सध्याच्या प्रभाव रचनासह निवडलेल्या ध्वनिवर प्रभाव लागू करते आणि संवाद बंद करते.
  • रद्द करा प्रभाव सोडते आणि संवाद बंद केल्यामुळे ध्वनिमध्ये कोणताही बदल होत नाही.
  • Help Button तुम्हाला माहितीपुस्तिकेमधील योग्य पानावर, या पृष्ठावर आणते


दुवे

|< प्रभाव, जनरेटर आणि विश्लेषकांची अनुक्रमणिका

|< प्रभाव यादी