मदत बटण
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
मदत बटण काही संवादांच्या पायथ्याशी असलेले चिन्ह आहे. क्लिक केल्यावर, ते आपणास माहितीपुस्तिकेमधील त्या संवादाविषयी संबंधित मदत माहितीवर घेऊन जाईल.
त्रुटी संदेश
त्रुटी संदेशांसाठी मदत बटण आपल्याला विशिष्ट समस्येबद्दल थोडक्यात माहिती देते.बऱ्याचदा त्या पृष्ठावरील दुवे असतात. दुव्यांमधून आपणास बरेच काही मिळू शकते.
उदाहरण :
ध्वनी उपकरण संदेश उघडताना त्रुटी. या प्रतिमेच्या तळाशी उजवीकडे क्लिक करून पहा .
प्रभाव, जनरेटर्स आणि विश्लेषक - आणि प्राधान्ये
ऑड्यासिटीमध्ये सध्या प्रभाव, जनरेटर आणि विश्लेषक आणि प्राधान्यांसाठी पृष्ठांवर मदत बटणे आहेत.या बटणावर क्लिक केल्याने तुम्हाला प्रभाव/जनरेटर/विश्लेषक किंवा माहितीपुस्तिकेमधील प्राधान्य विभागासाठी पृष्ठावर नेले जाईल.
उदाहरण :
विस्तारित प्रभाव. या प्रतिमेच्या तळाशी उजवीकडे क्लिक करून पहा.