त्रुटी: कॉपी करणे किंवा पेस्ट करणे
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
हे पृष्ठ कॉपी (किंवा कट) आणि पेस्ट वापरताना तुम्हाला आढळू शकणार्या दोन त्रुटी परिस्थिती दाखवते..
कॉपी आणि पेस्टच्या तपशीलांसाठी कृपया संपादन यादी : कॉपी, पेस्ट आणि दुसरी प्रत पहा.
दोन इशारे
तुम्ही चुकीच्या पद्धतीने कॉपी आणि पेस्ट करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला दोन चेतावणी मिळतील.
एका प्रकारचा गीतपट्टादुसऱ्यामध्ये पेस्ट करण्याची परवानगी नाही
याचा अर्थ असा की तुम्ही एका प्रकारचा गीतपट्टा(ध्वनि ट्रॅक, लेबल ट्रॅक, नोट ट्रॅक) दुसर्या ट्रॅकमध्ये पेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
याचा अर्थ नाही आणि ऑड्यासिटीने अवरोधित केले आहे.
मोनो ट्रॅकमध्ये स्टिरिओ ध्वनि कॉपी करण्याची परवानगी नाही
मोनो गीतपट्ट्यावरून स्टिरिओ गीतपट्ट्यावर कॉपी करणे शक्य असताना (ऑड्यासिटी डाव्या आणि उजव्या दोन्ही चॅनेलमध्ये समान सामग्री ठेवते) ऑड्यासिटी स्टिरिओवरून मोनोमध्ये पेस्ट करू शकत नाही कारण दोन चॅनेलमध्ये भिन्न ध्वनि माहिती असण्याची शक्यता आहे.