ऑड्यासिटी कॉन्फिगरेशन त्रुटी
सामग्री
ऑड्यासिटी सेटिंग्ज धारिका प्रवेशयोग्य नाही
तुमची ऑड्यासिटी कॉन्फिगरेशन धारिका लॉक झाल्यावर तुम्हाला खालील त्रुटी संदेश मिळेल (कधीकधी व्हायरस चेकर अॅप्स हे करतात).
याचा अर्थ ऑड्यासिटी त्या धारिकेवर लिहू किंवा वाचू शकत नाही.
प्रभावित होऊ शकणार्या कॉन्फिगरेशन धारिका पुढीलप्रमाणे आहेत :
- audacity.cfg - ऑड्यासिटीची मूलभूत सेटिंग्ज, उदाहरणार्थ प्राधान्ये सेटिंग्ज
- pluginregistry.cfg - कोणते प्लग-इन सक्षम आणि अक्षम केले आहेत ते व्यवस्थापित करते
- pluginsettings.cfg - प्लग-इनमधील पॅरामीटर्ससाठी सेटिंग्ज व्यवस्थापित करते
तीन पैकी कोणत्या धारिका प्रभावित आहे हे संदेश दर्शवेल.
उपाय
पुढे जाण्यासाठी तुम्हाला धारिका अनलॉक करणे आवश्यक आहे. एकदा ते अनलॉक झाल्यावर तुम्ही पुढे सुरू ठेवण्यासाठी
बटण वापरू शकता . वैकल्पिकरित्या तुम्ही बटणासह ऑड्यासिटी रद्द करू शकता आणि बंद करू शकता.मदत बटणावर क्लिक केल्याने तुम्हाला या पृष्ठावर आणले जाईल.
कॉन्फिगरेशन धारिकेचे स्थान
विंडोज
कॉन्फिगरेशन धारिका तुमच्या वापरकर्ता निर्देशिकेतील >Appdata>रोमिंग फोल्डरमध्ये ऑड्यासिटी नावाच्या फोल्डरमध्ये संग्रहित केल्या जातात.
- पूर्ण पथनाव असे आहे : C:\\Users\\<your username>\\Appdata\\Roaming\\audacity
मॅक
कॉन्फिगरेशन धारिका तुमच्या वापरकर्ता निर्देशिकेतील ग्रंथालय/अॅप्लिकेशन सपोर्ट फोल्डरमध्ये ऑड्यासिटी नावाच्या फोल्डरमध्ये संग्रहित केल्या जातात.
- पूर्ण पथनाव असे आहे : <your username>/Library/Application Support/audacity
लिनक्स
कॉन्फिगरेशन धारिका ऑड्यासिटी-माहिती नावाच्या फोल्डरमध्ये संग्रहित केल्या जातात.
यामध्ये प्रवेश करण्यासाठी :
- "होम" फोल्डर उघडा (पूर्वनियोजित धारिका ब्राउझरमध्ये "/होम/वापरकर्ता-नाव" उघडते),
- लपविलेले फोल्डर दाखवण्यासाठी Ctrl + H वापरा (बहुतेक सामान्य धारिका ब्राउझरमध्ये कार्य करते, किंवा "दृश्य यादी > लपविलेल्या धारिका दाखवा"),
- नंतर तुम्हाला ./ऑड्यासिटी-माहिती दिसेल.