प्रभाव यादी: एलएडीएसपीए
ऑड्यासिटी विकासाच्या माहितीपुस्तिकेवरून
एलएडीएसपीए (लिनक्स ध्वनि विकसकाची सिंपल प्लग-इन एपीआय) प्लग-इन मूलत: लिनक्स प्लॅटफॉर्मसाठी विकसित केली गेली होती, परंतु काही प्लग-इनची पोर्ट्स विंडोज आणि मॅकसाठी देखील उपलब्ध आहेत.
- बहुतेक एलएडीएसपीए प्लगइन प्रभाव असतात, परंतु ते ऑड्यासिटी चे काही अंगभूत ध्वनि जनरेटर प्रदान करण्यासाठी देखील वापरले जातात आणि ध्वनि विश्लेषणासाठी वापरले जाऊ शकतात.
- विंडोज, मॅक आणि लिनक्ससाठी अतिरिक्त एलएडीएसपीए प्लगइन डाउनलोड केले जाऊ शकतात. कृपया अधिक तपशील आणि दुव्यांसाठी ऑड्यासिटी वेबसाइटवर डाउनलोड पृष्ठाचा एलएडीएसपीए विभाग पहा.
- एलएडीएसपीए प्रभाव प्रत्यक्ष वेळ पूर्वावलोकनास समर्थन देते . ते प्रीसेटच्या आयात / निर्यातीला समर्थन देत नाहीत परंतु केवळ ऑड्यासिटीमध्ये वापरण्यासाठी प्रीसेट्स जतनिंगचे समर्थन करतात. काही एलएडीएसपीए प्लगइनमध्ये "प्रभाव आउटपुट" विभाग असतो जो प्रभाव लागू झाल्यानंतर प्रसिध्द केला जातो.
- एलएडीएसपीए प्रभाव लोड करणे प्लग-इन व्यवस्थापक: प्रभाव, जनरेटर आणि विश्लेषक संवादद्वारे नियंत्रित केले जाते.
एक एलएडीएसपीए प्लग-इन जोडत आहे
ऑड्यासिटी साठी एलएडीएसपीए प्लग-इन स्थापित करण्याच्या सविस्तर सूचनांसाठी पहा : विंडोज किंवा लिनक्स
वापरकर्ता प्रीसेट म्हणून एलएडीएसपीए प्रभाव रचना जतन करीत आहे
वापरकर्त्याच्या प्रीसेट म्हणून सद्य प्रभाव रचना जतन करण्यासाठी, प्रभावाच्या संवादात,
बटणावर क्लिक करा आणि नंतर निवडा ... जे खालील संवाद आणते :प्रीसेटसाठी नाव टाइप करा आणि नंतर
क्लिक करा ज्यानंतर जतन केलेला प्रीसेट व्यवस्थापित यादीमधील "वापरकर्ता प्रीसेट" यादीमध्ये दिसून येईल.एलएडीएसपीए प्रभाव पर्याय
प्रभावाच्या संवादात,
बटणावर क्लिक करा आणि नंतर खाली वर्णन केलेले संवाद आणण्यासाठी निवडा. आपण या संवादातील पर्याय बदलता तेव्हा ते बदल फक्त चालू असलेल्या प्रभावावर लागू होतात. इतर सर्व एलएडीएसपीए प्रभाव खाली दर्शविलेल्या पूर्वनियोजित पर्यायांवर राहतील जोपर्यंत आपण त्यांचे पर्याय बदलत नाही.- विलंब भरपाई : हे सेटिंग (पूर्वनियोजितनुसार सक्षम) एलएडीएसपीए प्रभावांमुळे झालेल्या लहरींचे स्वरूप विलंबाची भरपाई करते जे ध्वनि माहिती बफरवर प्रीलोड करते. नुकसानभरपाई सर्व प्रकरणांमध्ये कार्य करू शकत नाही आणि ते कार्य करण्यासाठी, परिणामामध्ये कोणतीही भरपाई किंवा विलंब अहवाल रचना सक्षम करणे आवश्यक आहे. भरपाई अयशस्वी झाल्यास किंवा हे ऑड्यासिटी सेटिंग अनचेक केले असल्यास, ध्वनि बफर करणारे प्रभाव प्रक्रिया केलेल्या निवडीच्या सुरुवाती शांतता घालतील आणि निवडीच्या शेवटी ध्वनीची संबंधित रक्कम काढून टाकतील. भरपाई सक्षम किंवा अक्षम करणे त्वरित प्रभावी आहे.