एडजस्टेबल फेड

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिके वरुन
येथून जा: निर्देशक, शोधा


एडजस्टेबल फेड विविध प्रमाणात आवाज कमी-जास्त करते. हा परिणाम फक्त 'फेड इन' किंवा 'फेड आउट' पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण आहे, फक्त शांतता आणि मूळ पट्टी यापेक्षा तो अम्प्लिकेशन लेव्हलमध्येही फेड होत जातो.
प्रवेश द्वारा: प्रभाव > एडजस्टेबल फेड...
Adjustable Fade.png

फेड प्रकार

या यादीमध्ये फक्त काही मुलभूत प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी एक "वर" (खालच्या पातळीपासून उच्च पातळीपर्यंत) किंवा "खाली" वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत) असे असू शकेल.

  1. फेड अप - यामध्ये कमी प्रमाणातील रचने पासून ते अधिक प्रमाणातील रचनेपर्यंत साधे एका रेषेतील किंवा वक्राकार असे फेड अप करता येते.
  2. फेड डाऊन - यामध्ये अधिक प्रमाणातील रचनेपासून ते कमी प्रमाणातील रचनेपर्यंत साधे एका रेषेतील किंवा वक्राकार असे फेड अप करता येते.

    एक "साधा" वक्र म्हणजे केवळ एका दिशेने जाणारा वक्र (कर्व्ह). उदाहरणार्थ पातळी ही प्रथम हळूहळू बदलली जाऊ शकते आणि नंतर वेगाने बदलली जाऊ शकते, किंवा फेडच्या सुरूवातीस वेगाने बदलू शकते आणि नंतर हळूहळू पातळी व्यवस्थित होऊ शकते.

  3. एस-वरून वक्र - हे एक "दुहेरी" वक्र प्रदान करते जो आधी एका बाजूने वाकतो आणि नंतर दुसऱ्या बाजूने. पातळी ही प्रथम हळूहळू वाढेल आणि नंतर, हळूहळू पातळी व्यवस्थित होण्याआधी अधिक गतीने वाढेल.
  4. एस-खालून वक्र - पातळी ही हळूहळू खाली जाईल आणि नंतर हळूहळू व्यवस्थित होण्याआधी मधल्या फेडच्या दिशेने अधिक गतीने जाईल.
Bulb icon फेड आणि क्रॉसफेड पृष्ठावर फेड प्रकार आणि त्यांचा वापर याबद्दल तपशीलवार मार्गदर्शक आहे.


मधली फेड समायोजित करा

या घसरपट्टीच्या नियंत्रणामध्ये +/- १०० (पूर्वनियोजित ०) ची पट्टी असते. हे "फेडचे प्रकार:" यादीमध्ये निवडलेल्या फेडचा आकार सुधारित करण्यास मुभा देते. हे नियंत्रण शून्यापेक्षा जास्त सेट केल्याने फेडचा मध्यभा ढकलला जाईल, तर नकारात्मक आकडे पातळी फेडच्या मध्यभागी खाली आणू शकतात.

  • जेव्हा 'फेड प्रकार: = फेड अप' असे वापरले जाते, तेव्हा शून्याची (पूर्वनियोजित) किंमत एका रेषेतील फेड तयार करेल.
    • शून्यापेक्षा जास्त असलेले आकडे हे सुरुवातीला विस्ताराची पातळी जास्त होण्याआधी, अधिक वेगाने फेड वाढवतील.
    • शून्यापेक्षा कमी असलेले आकडे हे सुरुवातीला हळूहळू फेड वाढवतील जास्त होण्याआधी, अधिक वेगाने फेड वाढवतील.
    • शून्यापासून जितकी दूर याची रचना केली जाईल, तितकी फेड ही वक्राकार होत जाईल.
    • मधल्या फेडचे विस्तार हे कधीही (मूळ) सुरुवातीच्या फेडपेक्षा कमी असणार नाही व शेवटच्या फेडपेक्षा जास्त असणार नाही.
  • जेव्हा 'फेड प्रकार: = फेड डाऊन' असे वापरले जाते, तेव्हा शून्याची (पूर्वनियोजित) किंमत एका रेषेतील फेड तयार करेल.
    • शून्यपेक्षा जास्त असलेले आकडे हे सुरुवातीला फेड हळूहळू खाली आणतील, व नंतरनंतर अधिक गतीने शेवटच्या पातळीपर्यंत जातील.
    • शून्यपेक्षा जास्त कमी आकडे हे सुरुवातीला जास्त वेगाने फेड खाली आणतील, व नंतरनंतर पातळी व्यवस्थित होईल.
    • रचनेत असलेल्या शून्यापासून हे जितके लांब असेल, तितकी फेड ही वक्राकार असेल.
    • मधल्या फेडचे विस्तार हे कधीही (मूळ) सुरुवातीच्या फेडपेक्षा जास्त असणार नाही व शेवटच्या फेडपेक्षा कमी असणार नाही.
Adjustable-Fades-Simple-Curves.png
  • जेव्हा 'फेड प्रकार: = एस कर्व्ह अप किंवा एस कर्व्ह डाऊन' असे वापरले जाते, तेव्हा
    • शून्यापेक्षा जास्त आकडे असतील तेव्हा फेडचे "दुहेरी वक्र" हे वैशिष्ट्य पुन्हा येईल, पण मध्यभागापेक्षा ते थोडे जास्त असेल.
    • शून्यापेक्षा कमी आकडे असतील तेव्हा फेडचे "दुहेरी वक्र" हे वैशिष्ट्य पुन्हा येईल, पण मध्यभागापेक्षा ते थोडे कमी असेल.

अशी सुरुवात /शेवट -

खालील यादी टक्केवारी किंवा डी.बी. यामध्ये निवड करण्यासाठी आहे. हे घटक सुरुवातीच्या आणि शेवटच्या मापदंडाच्या चौकटी खाली आणतील.

Warning icon अंतिम अशा दोन मजकूराच्या चौकटींमध्ये प्रत्येकी एक संख्या असणे आवश्यक आहे. ते प्राथमिक आणि अंतिम अशी फेडची मिळालेली विस्ताराची आकडेवारी नमूद करतील. पहिल्या मजकुराच्या चौकटीमध्ये जरी प्राथमिकतः मिळालेली (आकडेवारी) टाकली आणि अंतिमतः मिळालेली शेवटच्या मजकुराच्या चौकटीत टाकली, तरी त्याला महत्त्व नसते, किंवा फेड ही फेड प्रकार : निवड येथून निश्चित होत असल्याने उलट वेगळ्या पद्धतीनेही चालते.

सुरुवात (किंवा शेवट)

हे तुम्हाला सुरुवात (किंवा शेवट) पुन्हा सेट करण्यासाठी सक्षम करते. तुम्ही टक्केवारी एकक वापरत असल्यास ० चे पूर्वनियोजित अंक (शांत) तुम्हाला शांततेपासून फेडअप होण्यास सुरुवात करून देईल.

शेवट (किंवा सुरुवात)

हे तुम्हाला शेवट (किंवा सुरुवात) पुन्हा सेट करण्यासाठी सक्षम करते. तुम्ही टक्केवारी एकक वापरत असल्यास १०० चे पूर्वनियोजित अंक (शांत) तुम्हाला शांततेपासून फेडअप होण्यास सुरुवात करून देईल.


नियंत्रणे कशी कार्य करतात याचा अनुभव घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांचा निर्माण झालेल्या व्हाईट नॉईजवर ते चालवून पाहणे.

सुलभ प्रीसेट

निवडणाऱ्या या ड्रॉपडाऊनमध्ये बरेच निश्चित प्रीसेट वक्र आकारात उपलब्ध आहेत: रेखीय, घातांकारी, लोगॅरिदमिक, गोलाकार, कोझिन आणि एस-वक्र.

Adjustable Fade with Presets dropdown W10.png
Warning icon महत्वाचे: प्रीसेट वक्र निवडणे या परिणामासाठी सर्व इतर मापदंड रचना संवादाच्या चौकटीला अधिलिखित (ओव्हरराईड) करेल.
इतर मापदंड कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला या ड्रॉपखालीमधून "काहीही निवडलेले नाही" सेट करणे आवश्यक आहे.
सर्व प्रीसेट एकतर शांततेपासून मूळ स्तरापर्यंत फेडइन होतात किंवा मूळ स्तरावरील शांततेपासून फेड आउट होतात. लक्षात ठेवा की फेड इन आणि फेड आउटच्या प्रभाव्ससारखे या प्रभावमध्ये वरच्या भागाची निवड होत नाही. हा प्रभाव निवडलेल्या क्षेत्रातील रिकामी जागा शांतता म्हणून गृहीत धरेल, त्यामुळे प्रभाव लागू होण्यासाठी जे नेमके क्षेत्र हवे आहे तेच निवडणे येथे महत्त्वाचे आहे.
  • काहीही निवडलेले नाही: माहितीपुस्तिकेची रचना. फेड प्रकार, मिड फेड अॅडजस्ट, सुरुवात आणि शेवट (यांची) रचना या सर्व कार्यरत आहेत.
  • आतून रेखीय :फेड इन प्रभावसारखे
  • बाहेरून रेखीय :फेड आउट प्रभावसारखे
  • आतून घातांकीय : याची पातळी आवरणाचे साधन वापरण्यासारखीच वेगाने वर येते.
  • बाहेरून घातांकीय : याची पातळी आवरणाचे साधन वापरण्यासारखीच वेगाने खाली येते.
  • आतून लोगॅरिदमिक : जो शांततेतून सुरुवातीला मध्यम तीव्रतेने व नंतर कमी तीव्रतेने वर येतो असा "बाह्यगोलाकार" वक्र
  • लोगॅरिदमिक : जो सुरुवातीला हळूहळू व नंतर अधिक वेगाने खाली येतो असा "बाह्यगोलाकार" वक्र
  • आतून गोलाकार : जो शांततेतून, सुरुवातीच्या पातळीवरून एकाएकी व नंतर हळूहळू वर जातो असा "बाह्यगोलाकार" वक्र
  • बाहेरून गोलाकार : जो सुरुवातीच्या पातळीवरून हळूहळू खाली येतो आणि नंतर अगदी अचानक शेवटपर्यंत अधिक वेगाने खाली येतो असा "बाह्यगोलाकार" वक्र
  • आतील कोझीन : एक "बाह्यगोलाकार" वक्र जो शांततेतून मध्यम तीव्रतेने वर येतो आणि मूळ स्तरावर एक नितळ संक्रमण निर्माण करण्यासाठी हळूहळू 'लेव्हल आउट' होतो.
  • बाहेरील कोझीन : मूळ स्तरापासून नितळपणे संक्रमित असलेला एक "बाह्यगोलाकार" वक्र जो नंतर अधिक तीव्रतेने शांततेकडे खाली येतो.
  • आतील एस-वक्र : एक "दुहेरी" वक्र जो शांततेतून एक नितळ संक्रमण निर्माण करतो, हळूहळू अधिक तीव्रतेने वर येतो, नंतर मूळ पातळीवर एक नितळ संक्रमण तयार करण्यासाठी 'लेव्हल आउट' होतो.
  • बाहेरील एस-वक्र : एक "दुहेरी" वक्र जो शांततेतून एक नितळ संक्रमण निर्माण करतो, हळूहळू अधिक तीव्रतेने खाली येतो, नंतर मूळ पातळीवर एक नितळ संक्रमण तयार करण्यासाठी 'लेव्हल आउट' होतो. हे स्टुडिओ फेड आउट प्रभावच्या समान असते.

उदाहरणार्थ रचना

सुरुवात आणि शेवट हे "मूळ %" इतकी सेट केली गेली आहे असे या रचना गृहित धरतात. 'सुरुवात' आणि 'शेवट' रचनांचा क्रम महत्वाचा नाही हे लक्षात घ्या.

हवा असलेला प्रभाव फेड टाईप मिड-फेड एडजस्ट (%) सुरुवात (किंवा) शेवट शेवट (किंवा) सुरुवात
शांततेपासून मूळ पातळीपर्यंत लिनिअर फेड-इन फेड अप १००
मूळ पातळीपासून शांततेपर्यंत रेषात्मकफेड आउट फेड डाऊन १००
मूळ पातळीपासून अर्ध्या भागापर्यंत रेखीय फेड फेड डाऊन ५० १००
आवरणाचे साधन वापरण्यासारखे घातांकीय फेड आउट फेड डाऊन ० पेक्षा कमी १००
'समान शक्ती'च्या क्रॉसफेडसाठी फेड-आउट फेड डाऊन +५० १००
'समान शक्ती'च्या क्रॉसफेडसाठी फेड-इन फेड अप +५० १००
'स्टुडीओ फेड आउट'सारखा प्रभाव एस-वक्र डाउन १००
अर्ध्या मूळ आवाजातून दुप्पट मूळ आवाजापर्यंत हळुवार बदल वरील एस-वक्र ५० २००

बटणे

आज्ञा बटण दाबल्याने खालील परिणाम मिळतात:

  • 'व्यवस्थापन करा' एक ड्रॉपडाउन यादी' देते जे आपल्याला साधनासाठी प्रीसेट व्यवस्थापित करण्यास आणि साधनाबद्दल काही तपशील पाहण्यास सक्षम करते. तपशीलांसाठी 'प्रीसेट्सचे व्यवस्थापन' पहा.
  • 'पूर्वावलोकन' ध्वनिमध्ये वास्तविक बदल न करता, आत्ताच्या रचनेतील सेटिंगनुसार ध्वनिकसा ऐकू येईल याचे एक लहान पूर्वावलोकन चालू करते. पूर्वावलोकनाची लांबी संपादन > प्राधान्ये > प्लेबॅक, मधील आपल्या सेटिंगद्वारे निश्चित केली जाते, पूर्वनियोजित सेटिंग ६ सेकंद असते.
  • 'ठीक आहे' हे निवड केलेल्या ध्वनिला आत्ताच्या सेटिंगचे प्रभाव लागू करून संवाद बंद करते.
  • 'रद्द करा' हे दिलेले प्रभाव रद्द करून ध्वनिकाहीही बदल न करता सोडून देते आणि संवाद बंद करते.
  • Help Button माहितीपुस्तिकेमधील योग्य पानावर आपल्याला आणते, हे पान


दुवे

|< प्रभाव्सची अनुक्रमणिका, जनरेटर आणि विश्लेषक

|< प्रभाव्सची यादी