प्रवेशयोग्यता
- दृष्टिहीन व्यक्तींसाठी 'ऑड्यासिटी४ अंध मेलिंग यादी' यामध्ये तांत्रिक सहाय्य प्रदान केले गेले आहे.
कीबोर्डचे सोपे मार्ग
ज्या व्यक्ती माउसचा वापर करू शकत नाहीत, किंवा ज्यांना कीबोर्ड वापरणे जास्त जलद वाटते, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीबोर्डचे सोपे मार्ग उपलब्ध आहेत. हे कीबोर्डचे सोपे मार्ग सबंध माहितीपुस्तिकेत आणि 'कीबोर्डच्या सोप्या मार्गांचे संदर्भ' यात नमूद केले आहेत. 'कीबोर्ड पानावरील प्राधान्य' या संवादात ते सानुकुलित (कस्टमाईझ) करता येतात.
जे ऑड्यासिटीचे घटक कीबोर्डचा वापर करून संपूर्णपणे प्रवेशयोग्य नाहीत, त्यामध्ये हे समाविष्ट आहे :
- टाईम गीतपट्टे: हे अत्यंत लवचिक पद्धतीने ऑडीओ संगीतपट्ट्यांची गती नियंत्रित करू शकते.
- साधने साधनपट्टी: फक्त निवड करण्याचे साधन किबोर्डच्या साहाय्याने वापरले जाऊ शकते.
कीबोर्ड निर्देशकाच्या खालील पद्धती, ज्या विंडोज आणि लिनक्सवर सर्वसामान्य आहेत, त्या मॅकवर वेगळ्या पद्धतीने कार्य करतात.
- Alt कीद्वारे मेनुचे आणि बटणांचे निर्देशन हे Apple कडून समर्थित नाही. यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी Ctrl दाबून धरून F2 की दाबा, त्यानंतर यादीमध्ये हव्या असणाऱ्या गोष्टींची सुरुवातीची काही अक्षरे टाईप करा.
- मजकूर चौकटी आणि याद्या याशिवाय संवादांमधील टॅबिंग पूर्वनियोजनानुसार बंद आहे. टॅबिंग हे प्रणालीच्या कीबोर्ड-प्राधान्याच्या मार्फत सुरु केले जाऊ शकते. 'कीबोर्डचे सोपे मार्ग' निवडा, त्यानंतर त्यामध्ये 'पूर्ण कीबोर्ड प्रवेश' अंतर्गत 'सर्व नियंत्रणे' हे रेडिओ बटण निवडा.
स्क्रीन वाचक
ऑड्यासिटीचा बराचसा भाग हा विंडोज व मॅकवरील स्क्रीन वाचकांच्या वापरकर्त्यांसाठी खुला आहे, पण दुर्दैवाने लिनक्सबाबत मात्र असे नाही. पुढील दोन विभागांमध्ये विंडोज आणि मॅकवरील प्रवेशयोग्यतेची रूपरेषा दर्शविली गेली आहे.
विंडोज वर
जॉज विंडो-आइज आणि एनव्हीडीए स्क्रीन वाचक यांच्यासह विंडोजवर ऑड्यासिटी चांगले कार्य करते. स्क्रीन वाचकांच्या वापरकर्त्यांसाठी येथे 'ऑड्यासिटी वापरकर्त्यांसाठी मार्गदर्शन' आहे.
विंडोजवरील स्क्रीन वाचकाच्या वापरकर्त्यांसाठी धोक्याचे खालील भाग प्रवेशयोग्य नाहीत:
- ध्वनिसंगीतपट्ट्यांतील आयमाचे आवरण
- टाईम गीतपट्टे