ओग व्हॉर्बिस निर्यात पर्याय

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
येथे जा: निर्देशक, शोध
ओग व्हॉर्बिस निर्यात पर्याय ओजीजी फॉरमॅट कंटेनरमध्ये ओपन-सोर्स कॉम्प्रेस्ड, लॉसी व्हॉर्बिस कोडेक वापरतो. विंडोज मीडिया प्लेयर आणि अॅपल संगीत/ आयट्यून्स मध्ये ओजीजी फॉरमॅट प्ले केले जाऊ शकते, परंतु अतिरिक्त कोडेक डाउनलोड करणे आवश्यक आहे. स्ट्रीमिंग ऍप्लिकेशन्ससाठी ओग हे लोकप्रिय स्वरूप आहे.

ऑड्यासिटी अद्याप ओजीजी मध्ये स्पीक्स लो बिट रेट व्हॉइस कोडेक वापरण्यास समर्थन देत नाही.

याद्वारे प्रवेश केलेले: धारीका > निर्यात > ओजीजी म्हणून निर्यात करा
Export ogg dialog 3-0-0.png
याद्वारा देखील प्रवेश: धारीका > निर्यात > अनेक निर्यात करा... नंतर ओग व्हॉर्बिस धारीका प्रकार म्हणून जतन करा ड्रॉपडाउन यादीमधून निवडणे. अशावेळी निर्यात संवाद अनेक संवादाच्या मध्यभागी दिसेल.

ओग व्हॉर्बिस निर्यात सेटअप

  • गुणवत्ता: ० (सर्वात कमी) ते १० (सर्वोत्तम) पर्यंत गुणवत्ता सेटिंग निवडा. वर्तमान गुणवत्ता सेटिंग स्लाइडरच्या मध्यभागी प्रदर्शित केली जाते. ५ ची पूर्वनियोजित पातळी सामान्यत: ऑड्यासिटीच्या पूर्वनियोजित १२८ केबीपीएस एमपी३ एन्कोडिंग सारख्या आकाराची, परंतु उच्च दर्जाची धारिका तयार करते. उच्च ओजीजी गुणवत्ता रचनाचा अर्थ मोठा धारिका आकार आहे, कारण उच्च एकूण बिट दर वापरला जाईल.
ओजीजी एन्कोडिंग हा तांत्रिकदृष्ट्या VBR किंवा व्हेरिएबल बिट दर एन्कोडिंगचा एक प्रकार आहे, एमपी३ धारिका निर्यात करताना पूर्वनियोजितनुसार वापरल्या जाणार्‍याCBR किंवा स्थिर बिट दर एन्कोडिंगच्या विरूद्ध.

याचा अर्थ असा की संपूर्ण गीतपट्ट्यामध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यासाठी, एकल आवाज किंवा इन्स्ट्रुमेंट एन्कोड करण्यापेक्षा ध्वनीचा एक जटिल भाग (जसे की संपूर्ण ऑर्केस्ट्रल पॅसेज) एन्कोड करताना उच्च बिट दर वापरला जाईल. अधिक क्लिष्ट ध्वनि असलेले ध्वनीमुद्रण मोठी फाईल तयार करेल. सिलेक्शन साधनपट्टीमधील नमुना दर वाढवल्याने बिट दर वाढेल आणि त्यामुळे धारिकाचा आकार सुद्धा वाढेल(आणि उलट).