सीडी बर्न करा
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
स्वतंत्र सीडी प्लेयर्ससाठी, आपले काम ध्वनि सीडी मध्ये बर्न करण्यासाठी , पहिले त्याला डब्ल्यूएव्ही किंवा एआयएफएफ मध्ये निर्यात करा.
निर्यात केलेली डब्ल्यूएव्ही किंवा एआयएफएफ धारिका अशी असावी:
- स्टिरिओ
- ४४,१०० हर्ट्झ (प्रकल्प विंडोच्या तळाशी डावीकडे प्रकल्प रेटवर सेट करा)
- १६-बिट (धारिका निर्यात संवाद मधील "प्रकार म्हणून जतन करा" यादी वापरून निवडले आहे).
ह्या ऑड्यासिटीच्या पूर्वनियोजित सेटिंग्ज आहेत, त्यामुळे सामान्यपणे तुम्हाला निर्यात करण्यापूर्वी या बदलण्याची गरज नाही.
"ध्वनि सीडी" वर निर्यात केलेली धारिका बर्न करा - Apple Music/iTunes किंवा Windows Media Player सारख्या सीडी बर्निंग अनुप्रयोगासह "माहिती सीडी" किंवा "एमपी३ सीडी" नाही.
अधिक मदतीसाठी, सीडीमध्ये संगीत धारिका बर्न करणे पहा.