एएमआर निर्यातीचे पर्याय
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
ए.एम.आर. ही एक अनुकूलक बहु-मूल्य कोडेक पेटंट दिलेली संकुचन योजना आहे जी भाषणासाठी अनुकूलित आहे, परंतु भ्रमणध्वनी दूरध्वनी रिंगटोनसाठी देखील ती वापरली जाते. वाईड बँड प्रकारात ती उच्च गुणवत्तेसाठी उच्च बँडविड्थ वापरते.
- प्रवेश द्वार : नंतर ड्रॉपडाउन यादीमधून 'प्रकार म्हणून जतन करा' यातून ए.एम.आर. (नॅरो बँड) फाईल्स (एफएफएमपीईजी) निवडणे.
- हे देखील प्रवेशद्वार : नंतर ड्रॉपडाउन यादीमधून 'प्रकार म्हणून जतन करा' यातून ए.एम.आर. (नॅरो बँड) फाईल्स (एफएफएमपीईजी) निवडणे. अशावेळी निर्यात संवाद 'अनेक निर्यात करा' संवादाच्या मध्यभागी दिसेल.
एफ.एफ.एम्पेग. ऑड्यासिटीसह पाठविला जात नाही परंतु आपण तो डाउनलोड करुन नंतर या सूचनांचे अनुसरण करून त्याला ए.एम.आर. (एनबी) म्हणून निर्यात करू शकता. |
ए.एम.आर. - एन.बी. निर्यातीची रचना
- बिट दर : ४.७५ के.बी.पी.एस. ते १२.२ के.बी.पी.एस. पर्यंत (१२.२ के.बी.पी.एस.वर पूर्वनियोजित) बिट रेट निवडा. उच्च बिट दर उच्च गुणवत्ता देतात परंतु मोठ्या फाईल्स तयार करतात.
स्वरूपाच्या तपशीलामुळे, ए.एम.आर. - एन.बी. फाईल्स ऑड्यासिटी प्रकल्प दराकडे दुर्लक्ष करून नेहमीच ८००० हर्ट्ज नमुना दराने निर्यात केली जातात. |