प्रगत मिक्सिंगचे पर्याय

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
जेव्हा आयात/निर्यात या प्राधान्याच्या विभागातून तुम्ही "कस्टम मिक्स वापरा" हे निवडता, तेव्हा अॅडव्हान्स्ड मिक्सिंगचे पर्यायाचा संवाद बॉक्स समोर येतो. विविध चॅनलच्या (भोवतालच्या आवाजाच्या) फाईल्स निर्यात करण्यासाठी किंवा निर्यात केलेल्या फाईलमधील ऑड्यासिटीचे संगीतपट्टे व वाहिन्या यांच्यात कस्टमाइज्ड असाईनमेंट्स करण्यासाठी या संवाद बॉक्सचा वापर करा.
Custom Mix 5 channels.png

आपल्या प्रकल्पमधल्या डावीकडचा गीतपट्टा उजवीकडे दाखवलेल्या आउटपुट वाहिनीमध्ये खाली मिसळले जातील :

  • आपल्या प्रकल्पामधील संगीतपट्टे निळ्या चौकटीत दाखविलेले आहेत.
  • आउटपुट वाहिन्या ग्रे चौकटीत दाखविलेल्या आहेत.
  • आउटपुट वाहिन्यांचे आकडे बदलण्यासाठी आउटपुट वाहिन्यांचे स्लाईडर हवे तसे बदला.
  • कोणतीही चौकट निवडण्यासाठी किंवा न निवडण्यासाठी क्लिक करा. निवडलेली चौकटीची रेष लाल रंगाची आहे.
  • एखादी चौकट आधीच निवडलेली असताना, जेव्हा दुसऱ्या चौकटीवर क्लिक केले जाईल, तेव्हा दोन्ही चौकटी लिंक केल्या जातील; किंवा त्या दोन्ही चौकटी आधीच लिंक्ड असल्यास त्यांच्यातील लिंक काढली जाईल.
  • कोणत्याही लिंकवर क्लिक केल्याने ती लिंक काढली जाईल.

आपल्या इच्छेनुसार वाहिन्या व संगीतपट्टे जोडा, त्यानंतर विविध वाहिन्यांतील फाईल निर्यात करण्यासाठी "ठीक" वर क्लिक करा.

Warning icon आवाजाचे साधन (उपकरण) किंवा एखादी विशिष्ट फाईल ही त्याच्या फॉरमॅटसाठी शिफारस केल्यानुसार वाहिन्यांची आखणीचे (चॅनलच्या मॅपिंगचे) अनुसरण करेलच, अशी कोणतीही खात्री देता येत नाही.