एएसी निर्यात पर्याय
एफ.एफ.एम.पी.ई.जी. हे ऑड्यासिटीसोबत येत नाही, परंतु ते डाउनलोड करुन, नंतर खालील या सूचनांचे पालन करत 'एएसी'(एएसी) म्हणून निर्यात करता येऊ शकते. |
- प्रवेश द्वारा: मग ड्रॉपडाउन यादीतून एम ४ ए (एएसी) धारिका एफएफम्पेग पासून प्रकार म्हणून जतन करा निवडा.
- या देखील प्रवेश द्वारा:
अशावेळी निर्यात संवाद एकाधिक संवादाच्या मध्यभागी दिसेल.
मग ड्रॉपडाउन यादीतून एम ४ ए (एएसी) फायली एफएफम्पेग पासून प्रकार म्हणून जतन करा निवडा.
स्वरूप पर्याय
- गुणवत्ता:हा स्लायडर आउटपुट एएसी फाईलची गुणवत्ता ( kbps मध्ये बिटरेट) नियंत्रित करतो. कमाल बिटरेट (उत्तम गुणवत्ता) 320 kbps (स्टिरीओ) 160 kbps(मोनो) आणि किमान 98 kbps (मोनो) आहे. वर्तमान गुणवत्ता सेटिंग स्लाइडर पट्टीच्या मध्यभागी प्रदर्शित केली जाते.
१६० ची पूर्वनियोजित गुणवत्ता सेटिंग सामान्यत: समान आकाराची, परंतु ऑड्यासिटीच्या पूर्वनियोजित १२८ केबीपीएस स्थिर बिट रेटवर एमपी 3 च्या तुलनेत थोडी उच्च दर्जाची धारिका तयार करते. स्टिरिओ धारिका नेहमी तयार केली जाते, परंतु मोनो गीतपट्ट्यावरून निर्यात केलेल्या धारिकेचा स्टिरीओ ट्रॅकमधून निर्यात केलेल्याधारिकेच्या सुमारे अर्धा बिट दर (आणि म्हणून अर्धा धारिका आकार) असतो.
याचा अर्थ असा की संपूर्ण गीतपट्ट्यामध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यासाठी, एकल आवाज किंवा इन्स्ट्रुमेंट एन्कोड करण्यापेक्षा ध्वनीचा एक जटिल भाग (जसे की संपूर्ण ऑर्केस्ट्रल पॅसेज) एन्कोड करताना उच्च बिट दर वापरला जाईल. अधिक क्लिष्ट ध्वनिअसलेले ध्वनीमुद्रण मोठी फाईल तयार करेल. सिलेक्शन साधनपट्टीमधील नमुना दर वाढवल्याने बिट दर वाढेल आणि त्यामुळे धारिकाचा आकार (आणि उलट).