स्पर्धेविषयी माहिती
मराठी भाषेतील ऑड्यासिटी अनुप्रयोगाचा वापर करून ध्वनीफीत मुद्रण करूने, आणि ऑड्यासिटीच्या विविध वैशिष्ट्यांचा वापर करून ध्वनीफीत संपादन करणे.
स्पर्धेचा कालावधी:
स्पर्धा गुढी पाडवा शुद्ध प्रतिपदा (१३/०४/२०२१) पासून सुरु होत आहे आणि अंतिम मुदत पौर्णिमा (२७/०४/२०२१) आहे
अधिक माहितीसाठी
स्पर्धेचे नियम आणि अटी
- ऑड्यासिटी अनुप्रयोगाचा मराठी भाषा मध्ये वापर करून ध्वनिफीत मुद्रण करणे आणि ऑड्यासिटीच्या विविध वैशिष्ट्यांचा वापर करून ध्वनिफीत संपादन करणे.
- ध्वनिफीत मुद्रण व संपादन करीत असतानाचे चित्रीकरण (Screen Recorder) करणे तसेच ऑड्यासिटीच्या विविध वैशिष्ट्यांचा वापर करतानाचे प्रतिमा (ScreenShot) घेणे आणी ध्वनिमुद्रण केलेले ध्वनीफीत इत्यादी. प्रवेश नोंदणी आर्जामध्ये भरणे.
- सहभाग स्वरूपन : अर्जामध्ये आपली माहिती, चित्रीकरण धारिका (Screen Recorded video), ध्वनिमुद्रण निर्यात केलेली ध्वनी धारिका (.mp3)(Exported file) व त्याच्या काही प्रतिमा (ScreenShots) योग्यरीतीने प्रवेश नोंदणी अर्ज मध्ये भरावे
- स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क (फी) नाही
- स्पर्धा गुढी पाडवा शुद्ध प्रतिपदा(१३/०४/२०२१) पासून सुरु होत आहे.
- धारिका पाठवण्याची अंतिम मुदत पौर्णिमा (२७/०४/२०२१) करावा पर्यंत राहील.
- स्पर्धेचा निकाल दि. १ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल
- प्रथम २५००
- द्वितीय २०००
- तृतीय १५००
- उत्तेजनार्थ ३ बक्षीसे ₹५०० प्रत्येकी
- स्पर्धकाचा वैयक्तिक सहभाग असणे आवश्यक.
- स्पर्धेतील सहभाग स्वरूपन हे स्पर्धकाने स्वतः तयार केलेले असावे.
- स्पर्धकाच्या मुद्रित ध्वनिफीत मध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द, तिरस्कार, सांप्रदायिक, जातीय, बदनामीकारक, लैंगिक, क्षोभक, अवमानकारक, राजद्रोह संकल्पना, विचार किंवा भाषा नसेल, तसेच त्यात बेकायदेशीर अवैध, अनैतिक आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधी असा कोणताही ध्वनी नसेल. याशिवाय ज्यामुळे कुणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप किंवा भंग होईल, असा ध्वनी किंवा अन्य कुणाच्या बौद्धिक संपदेचे उल्लंघन करणारे काहीही आपल्या ध्वनिफीत नाही याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी.
- ध्वनीफीत तयार करताना ऑड्यासिटी मराठी वापरणे आवश्यक आहे न वापरल्यास किंवा इतर भाषेतील ऑड्यासिटी वापरल्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल
- ध्वनीफीत मधील ध्वनी मराठी मध्ये असणे अनिवार्य.
- स्पर्धेचे नियम बदलण्याचा / सुधारित करण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम असेल व तो स्पर्धकाना बंधनकारक राहील.
- खाली दिलेला ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज मराठी भाषेत संपूर्ण भरणे आवश्यक आहे.
- नाव नोंदणी करताना ओळख पत्र आवश्यक असेल
- ऑड्यासिटी नवीनतम आवृत्ती: ३.०.० दिलेल्या दुव्यावरून डाऊनलोड केलेले असावे, डाऊनलोड करण्यासाठी दुवा - ऑड्यासिटी आवृत्ती ३.०.० , अन्यथा आपला प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही
- नियमात काही बदल झाल्यास सहभागींना आगाऊ माहिती देण्यात येईल
- प्रवेशिका/अर्ज यांची अल्पसूची (शॉर्ट लिस्ट) तयार करणे आणि विजेते ठरविणे यासाठी आयोजक एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेमेंट अंड कॅरिअर कौर्सेस (आय एम सी सी), पुणे, महाराष्ट्र एक परीक्षक मंडळ तयार करील. परीक्षकांचा व एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेमेंट अंड कॅरिअर कौर्सेस (आय एम सी सी), पुणे, महाराष्ट्र यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.
- एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेमेंट अंड कॅरिअर कौर्सेस (आय एम सी सी), पुणे, महाराष्ट्र ही संस्था स्पर्धकांची व्यक्तीगत माहिती आणि तिचा वापर याचा आदर बाळगते. जर स्पर्धकांस स्पर्धेच्या गोपनीयतेच्या धोरणाबद्दल काही प्रश्न असतील तर त्याने/तिने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा.
एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेमेंट अंड कॅरिअर कौर्सेस (आय एम सी सी), पुणे, महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या ऑड्यासिटी मराठी भाषा मध्ये वापरून ध्वनी संपादन करणे स्पर्धा (या पत्रकात या पुढे ‘स्पर्धा’ असा उल्लेख केला आहे.) यात तुम्ही सहभागी होण्यासाठी; त्यातील कायदेशीररीत्या बंधनकारक असणार्या अटी खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत. या अटी नुसार तुम्ही (म्हणजे ‘स्पर्धक’) सध्या लागू असणारे सर्व कायदे आणि अटी यांचे पालन करणे आवश्यक आहे. कृपया तुम्ही हे नियम वाचावे आणि त्यातील सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत असे या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सादर करावयाच्या अर्जा मध्ये दिलेल्या जागेवर टीका करून निर्देशित करावे.
स्पर्धेचा तपशील
तारखा व स्पर्धेचा कालावधी
बक्षीस
पात्रता, प्रतिनिधितत्व आणि हमी
परीक्षक मंडळ
गोपनीयतेचे धोरण
स्पर्धेचा कालावधी
स्पर्धेचा कालावधी गुढी पाडवा शुद्ध प्रतिपदा (१३/०४/२०२१) पासून ते पौर्णिमा (२७/०४/२०२१) पर्यंत राहील
स्पर्धेचा निकाल १ मे २०२१ रोजी
देण्यात येईल.
ऑड्यासिटी प्रकल्प माहिती
राज्य मराठी विकास संस्था
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली . ‘संस्था नोंदणी अधिनियम, १८६०’ आणि ‘ सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५०’ या अन्वये दिनांक २ जानेवारी १९९३ रोजी संस्थेची धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी झाली. त्याला अनुसरून राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने संगणक आणि मराठी प्रकल्पांतर्गत संगणकावर मराठीचा वापर वाढावा आणि संगणकीय साधनांची माहिती मराठीतून उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात..
अधिक माहितीसाठी
एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेमेंट अंड कॅरिअर कौर्सेस (आय एम सी सी)
ह्या पदव्युत्तर व्यवस्थापन संस्थेची मुहूर्तमेढ दिनांक १२ सप्टेंबर १९८३ मध्ये रोवली. आज आय एम सी सी मध्ये “एम सी ए” (व्यवस्थापन शाखा) हा ए आय सी टी ई मान्यताप्राप्त दोन वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम ३६० विद्यार्थी क्षमतेने २००० सालापासून चालविला जातो. त्याचप्रमाणे एम बी ए आणि डी टी एल हे अभ्यासक्रमही चालविले जातात. सर्व वर्ग सावित्रीबाई फुले विद्यापीठाला संलग्न आहेत. अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
ऑडयासिटी या प्रकल्पाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
ऑडयासिटी ह्या आज्ञावलीच्या २.३.० ह्या आवृत्तीच्या वापरकर्त्यांसाठीच्या माहितीपुस्तिकेचे मराठीकरण करणे/ मराठीत माहितीपुस्तिका तयार करणे
ऑडयासिटी ह्या आज्ञावलीत वापरण्यात येणाऱ्या इंग्लिश संज्ञांना मराठी संज्ञांचे पर्याय देणे.
ध्वनिमुद्रण-संपादन तसेच ऑडयासिटी ह्या आज्ञावलीशी संबंधित विशिष्ट संज्ञा आणि संकल्पना इ. समजावून देणारे मराठी लेख तयार करणे.
ऑडयासिटी २.३.० ह्या आज्ञावलीच्या संवादपटलाचे (इंटरफेस) मराठीकरण करणे